|| ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् ।। ||
असे चपखल वर्णन, समर्थ रामदास आपल्या मनाच्या श्लोकामध्ये गणपतीचे करतात. तर असा हा गणांचा पती म्हणून गणपती सर्व देवांमध्ये अग्रपूजेचा अधिकारी आहे. अष्टविनायका व्यतीरिक्त प्रसिद्धीस आलेल्या अनेक मंदिरांपैकी एक मंत्रभूमी नाशिक येथील उपनगर स्थित श्री गणेशाचे इच्छामणी ( सर्व इच्छा पूर्ण करणारे ) मंदिर आहे. )स्व. चंद्रकांत दादा जोशी महाराज ( धार , मध्यप्रदेश ) यांनी १९८६ रोजी या मंदिरात भगवान गणेशाची स्थापना केली. त्यांना एकूण २१ मंदिरे बांधायची होती त्यापैकीच हे एक होय. सदर मंदिर हे पूर्णपणे नवीन धारनीचे असून, मार्बलचा उपयोग करून स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. भगवान गणेश व दोन्ही बाजूला मुख्य मूर्तीपेक्षा लहान अशा रिद्धी सिद्धी अशी मूर्तीची योजना केली आहे सभामंडप प्रशत्य आहे.